केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. शहा यांनी भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला. यानंतर सातत्याने राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. गुरुवारी ठाकरे शिवसेना पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले यांनी देखील अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी,”भाजपकडे काहीच काम उरले नाही. ते रिकामे बसले आहेत” असे त्यांनी यावेळी म्हटले.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी,”अमित शहांची जीभ घसरली असेल तर त्यांनी माफी मागावी, माफी मागितली तर काय होईल? आंबेडकर हे या देशाचे देव आहेत. आंबेडकरांनीआंबेडकरांनी वंचितांना शिखरावर नेले. अमित शहा ज्या शैलीत बोलत होते त्याला मस्ती म्हणतात. ” असे म्हणत राऊतांनी अमित शाह यांच्यावर टीका केली.
संजय राऊत यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला. यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना “तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य कधी झालात,? रिकाम्या हाताने बसलेला भाजप हा कोणता पक्ष आहे.असा असे काही सवाल यावेळी संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केले.
उद्धव ठाकरेंनी अमित शहांवरही साधला निशाणा Sanjay Raut on Amit Shah ।
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दावा केला की, अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेली टिप्पणी भाजपचा ‘अहंकार’ दर्शवते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. ठाकरे यांनी भाजपवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकरांसह महाराष्ट्रातील प्रतिकांचा आणि व्यक्तिमत्त्वांचा अपमान केल्याचा आरोप केला.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) भडकावल्याशिवाय शाह यांनी डॉ. आंबेडकरांबद्दल भाष्य करण्याची हिंमत केली नसती, असा दावा त्यांनी केला. “डॉ. अमित शहा यांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यातून पक्षाचा (भाजप) अहंकार दिसून येतो आणि या टिप्पणीमुळे पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे,” असा दावा देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.