अफगाणिस्तानचा पाकवर हल्ला, 19 पाकिस्तानी सैनिक ठार
काबूल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, अफगाण मधील तालिबानने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. या हल्ल्याने विवादित ड्युरंड लाइनच्या आजूबाजूला असलेल्या विविध ठिकाणांना निशाणा बनवले, याचे प्रमुख कारण म्हणजे अफगाणिस्तानने नेहमीच पाकिस्तानची सीमा म्हणून या भागांना नाकारले आहे. अफगाण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी विमानांनी अफगाणिस्तानच्या सीमेच्या आत हवाईमार्गाने बॉम्बफेक केली, ज्यामध्ये अफगाणी नागरिक ठार झाले आणि म्हणूनच हा प्रतिहल्ला करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांनी पाकिस्तानमधील केवळ अशा भागांना लक्ष्य केले जिथे काही अन्यायी लोकं लपलेली आहेत. अफगाणी संरक्षण मंत्रालयाने या लोकांकडूनच अफगाणिस्तानवर हल्ला करण्यात आल्याचा देखील दावा केला गेलाय. अफगाणच्या निशाण्यावर पाकिस्ताला का आहे असा प्रश्न उपस्थित केला असता, मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खोवरझमी यांनी या प्रश्नाची पुष्टी केली नाही, ते म्हणालेत की त्यांना हा भाग पाकिस्तानचा वाटत नाही.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात हवाई हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 46 जणांचा मृत्यू झाला होता. आता अफगाणिस्तानकडून या हवाई हल्ल्याचा बदला घेत पाकच्या सैनिकांवर हल्ला केला आहे.
अफगाणिस्तानच्या सीमेवर झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या निमलष्करी दलाचे 19 जवान ठार झाले, तर काहीजण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या प्रत्युत्तरात काही अफगान सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांत आणि अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांताच्या सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्याकडून रात्रभर गोळीबार सुरू होता.
तालिबानच्या अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमधील दक्षिणपूर्वेतील पक्तिका प्रांतात पाकिस्तानकडून हवाई हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या हल्ल्यात 46 जण मारले गेल्याचा आरोप तालिबानच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानकडून पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला आहे. हवाई हल्ल्याबाबत बोलताना पाकच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष करण्यात आले होते, असा दावा केला होता.
सीमेवरील चकमकीबाबत तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की, त्यांच्या सैन्याने पाकिस्तानमधील काही ठिकाणांवर हल्ला केला आहे. या ठिकाणांचा वापर हल्ल्यांचे नियोजन आणि समन्वय करण्यात सहभागी असणाऱ्यांना लपण्यासाठी केला जात होता.