इतर

तर धनजंय मुंडे यांना रस्त्यावर हिंडू देणार नाही : जरांगे पाटील

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार असून, त्यातील 2 आरोपींना पकडले आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. 25 दिवसांनी सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

या प्रकरणातील मारेकऱ्यांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी 11 वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयापासून या मोर्च्याला सुरुवात झाली. त्यानंतर महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानल पेठ मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप झाला.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींना आज पुण्यातून अटक करण्यात आली. तर 31 डिसेंबरला वाल्मिक कराड देखील पुण्यातच सीआयडीला शरण आला होता. यावर बोलताना सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडतात? आरोपींना पुण्यात कोणी सांभाळलं? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, माणसांच्या हत्या होत असल्यानं सहन होत नाही, एकही आरोपी बाहेर आला तर सोडणार नाही. धनंजय मुंडे हत्या प्रकरणात सापडले तर त्यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारलं तो जातीयवाद नाही का? आमचे लोक मारून तुमचे आरोपी लपून ठेवा. यापुढे जर हल्ला झाला तर उत्तर जशाचं तसं उत्तर द्या, न्याय आरक्षण मागितलं की आम्ही जातीयवादी? धनंजय देशमुख न्यायासाठी फिरतात तर तुम्ही त्यांना धमक्या देतात. खंडणी, हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट व्हावी, संतोष देशमुखांना न्याय दिल्याशिवाय मागे हटायचं नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. दुसरीकडे आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे.

गुन्ह्यातील आरोपींचीही नार्को टेस्ट व्हायला हवी !
दरम्यान, या मोर्चात मनोज जरांगे यांच्यासह देशमुखांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. या मोर्चाआधी मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “आरोपी फरार असले तरी सरककारला त्यांना पकडावं लागणार आहे. एक काम मुख्यमंत्र्यांकडून होण्याचं गरजेचं आहे ते म्हणजे सर्व आरोपींची नार्को चाचणी केली पाहिजे. ती सरकारने करायलाच पाहिजे.

खंडणीतील गुन्ह्यातील आरोपींचीही नार्को टेस्ट व्हायला हवी. सरकारने कसलीही हयगय करु नये. यामागे मोठं रॅकेट आहे. पुण्यातूनच सगळ्यांना अटक केली जात असेल तर सरकार किंवा सरकारमधील कोणत्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय पाठबळ आहे, त्यामुळे नार्को टेस्ट गरजेची आहे’. असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले, “एका बांधवाची क्रूरपणे हत्या झाली आणि आरोपांना सांभाळण्यात मोठेपण वाटणारे हे नेमके कोण आहेत? आरोपींना भाकरी खावू घालावी, त्यांना ऐशोआरामाचं जीवन द्यावंसं वाटतं हे कोण आहेत? सरकाराने त्यांना मागे ठेवू नये. नार्को टेस्ट झाल्यास यामध्ये 100 टक्के सरकारचे कोणते मंत्री, आमदार आहेत हे समोर येईल,” असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

बापाचा बाप आला तरी प्रकरण थंड होऊ देणार नाही…
हे प्रकरण थंड व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “यांच्या बापाचा बाप आला तरी प्रकरण थंड होऊ देणार नाही, दबू देणार नाही. तुम्ही लपताय ना मग आता बघा. सीआयडी, पोलीस प्रशासन, एसआयटी जे चौकशी करत आहेत यांनी नुसतं ऐकून घेऊ नका. पुढे असे खून कऱणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत, त्यासाठी ज्यांना मदत केली त्यांना कडक शिक्षा करा. लपवून ठेवलं म्हणजे तेदेखील षडयंत्रात सहभागी होते. यांना धडा शिकवणं गरजेचं आहे”.

वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर आरोपी वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या तसेच पवनचक्कीला दोन कोटी रुपयांच्या खंडणी मागणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी विष्णू चाटेने चौकशीत मोठी कबुली दिले आहे. वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला होता, अशी माहिती चाटे याने सीआयडी तपासात दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button