क्राइममहाराष्ट्र

सरपंच देशमुख हत्याप्रकरणातील दोन आरोपी अटकेत, एक अजूनही फरार

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील तीनपैकी 2 आरोपींना पकडले आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. यातील मास्टरमाईंड आरोपी वाल्मीक कराड याने यापुर्वीच पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात शरणागती पत्करली आहे. आता 25 दिवसांनी सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

सुदर्शन घुले, सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकालाहीपोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परंतु अद्याप पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली नाही.

तर याप्रकरणातील कृष्णा अंधाळे अजूनही फरार आहे. हे तिन्हही आरोपी अनेक दिवसांपासून फरार होते. तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. विशेष पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पुण्यात छापेमारी करून या आरोपींना ताब्यात घेतले.

एका डॉक्टरलाही अटक
याशिवाय संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचवेळी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसेलाही अटक करण्यात आली आहे. वायबसेच्या कसून चौकशीनंतरच आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे.

मोस्ट वॉन्टेड म्हणून केले होते घोषित
या प्रकरणातील वाल्मिक कराड, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतिक घुले हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषीत केले होते. यामध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे अशी फरार आरोपींची नावे होती. पोलिसांनी प्रसिद्धपत्रक जाहीर करत आरोपींना फरार घोषित केले होते. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी वाल्मिक कराडसाठी काम करत असल्याचे म्हटले जाते.

दरम्यान, संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे परिणाम संपूर्ण राज्यात उमटले होते. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात होती. यातच आता दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button