महाराष्ट्रराजकारण

बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांची शक्यता, इतर शहराची ही आहे संभाव्य यादी

मुंबई : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणासह पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवा, अशी मागणी चांगलीच जोर धरत आहे. दुसरीकडे, बीडमधील संपूर्ण गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मुंडे बहीण-भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी कोणीही घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महायुतीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप असल्याने कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कुणाकडे जाणार ? याची उत्सुकता सगळ्यांना लागून होती. अशातच आता पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. मात्र, या यादीत मंत्री धनंजय मुंडे नाही.

राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण तापलेले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. याअगोदर खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडने स्वःताह शरणागती पत्करली आहे. त्याच्यावर देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप केला जात आहे. वाल्मीक कराडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याने त्यांची राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामुळे संभाव्य पालक मंत्र्यांच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव नसल्याचे सांगण्यात येत आहे.

तर बीड जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याकडे घेणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच पुण्याचे पालकमंत्री पद देखील अजित पवार यांच्याच वाट्याला जाणार आहे. यामुळे बीड आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असतील असे सांगण्यात येत आहे.

पालकमंत्रिपदाची संभाव्य यादी
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सांगली – शंभूराज देसाई
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचाही दावा
यवतमाळ – संजय राठोड / भाजपाचाही दावा
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अकोला – माणिकराव कोकाटे
अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा – राष्ट्रवादी अजित पवार
बुलढाणा – आकाश फुंडकर
चंद्रपूर – नरहरी झिरवळ
धाराशीव – धनंजय मुंडे
धुळे – जयकुमार रावल
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
गोंदिया – अजित पवार
हिंगोली – आशिष जैस्वाल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई शहर – योगेश कदम
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
नांदेड – भाजपाकडे राहिल
नंदुरबार – भाजपाचा दावा
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजनांचाही दावा
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
वाशिम – माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक
जालना – अतुल सावे
लातूर – बाळासाहेब पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button