भाईजानच्या सुरक्षेत वाढ; सलमान खानच्या घराला बसवल्या बुलेटप्रूफ काचा
बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. सलमान खानच्या मुंबईतील घराला बुलेट प्रुफ काचा लावण्यात आल्या आहेत. वांद्रे येथील सलमान खानच्या घराच्या खिडक्या आणि बाल्कनीला बुलेट प्रूफ काचा बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय फेन्सिंग आणि हायटेक कॅमेरे देखील बसवण्यात आले आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीनंतर सलमान खानच्या जीवाला धोका असल्याने त्याला सुरक्षा पुरवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बुलेट प्रूफ काचा आणि पोलीस चौकी
सलमानच्या वांद्रे येथील घराच्या खिडक्यांना बुलेट प्रूफ बनवण्यात आले असून, उच्च तंत्रज्ञान सुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत. इतकंच नाही तर तिथे हाय रिझोल्युशनचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. घरासमोरच पोलिसांनी चौकी केली आहे. सलमान खानच्या जवळचे मित्र माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. यासाठी 17 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, असा खुलासा 4 हजाराहून अधिक पानांच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. याशिवाय लॉरेन्स बिश्नोईच्या सलमान खानला मारण्यासाठीही प्लॅन आखला होता.
काळवीट शिकार प्रकरणावरून लॅारेन्स बिश्नाई टोळीकडून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अॅाक्टोबर २०२४ मध्ये बाबा सिद्दकी यांची हत्या झाल्याच्या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
14 एप्रिला सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंच्या इथे फायरिंग झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात बिश्नाई टोळीचा संबंध असल्याचे समोर आले होते. गेल्या काही वर्षांपासून सलमान खानला बिश्नाई टोळी टार्गेट करताना दिसत आहे. सलमानला आणि त्याच्या घरातील सदस्यांना धमकीचे फोन येत आहेत. यामुळे सलमानने त्याच्या अपार्टमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बुलेटप्रुफ काच, सीसीटीव्ही कॅमेरे आदी गोष्टी बसवलेल्या आहेत. बिग बॉस 18 च्या शोच्या शूटला सलमान खानच्या सुरक्षेसाठी 60 पेक्षा जास्त सिक्युरिट गार्ड आहेत. त्याच्या बहुचर्चित सिकंदर या चित्रपटाच्या सेटवरही सलमानला Y+ सुरक्षा पुरवण्यात येत आहे.
प्रकरण काय होतं ?
1998 साली हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंग दरम्यान काळवीट प्रकरण घडले होते. ज्यात सलमान खानने बिश्नाई समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या काळवीटाची शिकार केली होती, असा आरोप त्याच्यावर आहे. तेव्हापासून सलमान बिश्नाई टोळीच्या रडारवर आला आहे. सध्या गँगस्टर लॅारेन्स बिश्नाई तुरुंगात असून त्याच्या साथदारांकडून गेल्या काही दिवसांपूर्वी हल्ला केल्याचे सांगण्यात येत होते.