महात्मा गांधीवर पोस्ट करणे पडले महाग, स्वरा भास्करचं एक्स अकाउंट कायमस्वरुपी बंद
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मागच्या अनेक दिवसांपासून ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या स्वरा भास्करने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये तिचे ट्विटर अकाउंट कायमचे बंद झाल्याचे सांगितले आहे. तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करत स्वरा भास्करने तिचे x अकाऊंट खाते कायमचे बंद झाल्याची माहिती दिली. कारण मी लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टसोबत अभिनेत्रीने एका लांबलचक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या पोस्टच्या दोन प्रतिमांना कॉपीराईट उल्लंघन म्हटले गेले आहे. याच कारणामुळे माझे खाते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय केली होती पोस्ट?
‘एक फोटो ऑरेंज कलर बॅकग्राउंडमध्ये होता. ज्यावर लिहिले होते की गांधी, आम्हाला लाज वाटते. ही भारताची पुरोगामी घोषणा आहे. मग हे कॉपीराइट उल्लंघन कसे होते? दुसरी प्रतिमा माझ्या मुलीची होती जिचा चेहरा दिसत नाही. ती भारताचा झेंडा फडकावत आहे. ज्यावर लिहिले होते- ‘Happy Republic Day India.’ अशी पोस्ट तिने शेअर केली होती.
स्वरा भास्कर विषयी बोलायचे झाल्यास ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती मागच्या काही दिवसांपासून राजकारणाशी संबंधित मुद्द्यांवर वक्तव्य करताना दिसत आहे. स्वरा भास्करने फेब्रुवारी 2023 मध्ये समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदशी लग्न केले. दोघांना एक मुलगी आहे.