पुणे येथील मोर्चा सोडून जरांगे पाटील गावी, घरात घडली दुखद घटना
पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी विविध मागण्यासाठी पुणे शहरामध्ये सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय, सर्व जाती – धर्मीय नागरिक, राज्यभरातील काही प्रमुख नेते तसेच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र हा मोर्चा अर्धवट सोडून त्यांना गावी परतावे लागले आहे.
त्यांनी या मोर्चामध्ये आंदोलकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि मोर्चातून माघारी परतले. जरांगे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जरांगे यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झाले आहे, त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी जरांगे हे मोर्चा अर्धवट सोडून परतल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकऱणात वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर केल्यानंतर आणखी तीन जणांना पुण्यातूनच ताब्यात घेण्यात आले, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांना सुरूवातील अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर 22 दिवसांनी वाल्मिक कराडने पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर केले. पण तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हेदेखील गेल्या 25 दिवसांपासून फरार होते. वाल्मिक कराडसह सीआयडीचे पथक या तिघांचाही शोध घेत होते. त्यातील आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे. पण कृष्णा आंगळे अद्यापही फरार आहे. वाल्मिक कराडसह या सर्वांना 14 दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांची सीआयडी चौकशीही सुरू आहे.