देश-विदेश
अमेरिकेचे प्रत्युत्तर, इराक-सीरियात ८५ ठिकाणी एअरस्ट्राइक, १८ दहशतवादी ठार
वॉशिंग्टन : अमेरिकेनं जॉर्डनमधील हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून सीरिया आणि इराकमधील ८५ ठिकाणांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या एअरस्ट्राइकमध्ये १८ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या सैन्यानं याबाबत माहिती दिली. शुक्रवारी इराक आणि सीरीयामध्ये इराण रिवॉल्युशनरी गार्ड आणि त्यांच्या समर्थक मिलिशियाशी संबंधित ८५ ठिकाणांवर हल्ले केले. अमेरिकी सैन्यानं कुर्दीश सैन्याला निशाणा बनवलं.
या एअरस्ट्राइकमध्ये अल-कायदाशी संबंधित दहशतवादी संघटनेचा नेता मोहम्मद सलाह अल-जबीर हा ठार झाला आहे. तो अल-कायदाशी संबंधित हुर्रस अल-दीन नावाच्या गटाचा भाग होता. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, हा हवाई हल्ला सीरियामधील दहशतवादी गटांना नष्ट करणे व त्यांच्या कारवाया रोखणे हा यामागचा उद्देश आहे.