महाराष्ट्रराजकारण

राजकारणात काहीही होऊ शकते… शरद पवारांच्या संघ कौतुकनंतर फडणवीसांचे वक्तव्य

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातील आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले होते. संघाच्या योग्य रणनितीमुळेच महायुतीला विधानसभेत मोठे यश मिळाल्याचे शरद पवार म्हणाले होते. पवारांनी संघाचे कौतुक केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुन्हा बदलणार का? भाजप आणि शरद पवारांची जवळीकता वाढ चाललीये का? अशा चर्चांना सुरूवात झाली. यावर बोलताना आता मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘राजकारणात काहीही होऊ शकतं. असं व्हावंच असं वाटत नाही, परंतु काहीही होऊ शकतं’, असं वक्तव्य केल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातील आढावा बैठक पार पडली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, संघाकडे बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी हिंदुत्व संघटनेच्या विचारसरणीशी एकनिष्ठता दर्शविली आणि कोणत्याही स्थितीत ते आपल्या मार्गावरून भरकटले नाहीत.’ यावेळी बोलताना संघाने विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामामुळे महायुतीला मोठा विजय मिळवता आला, असे म्हणत संघाची स्तुती केली.

‘राजकारणात काहीही होऊ शकतं’
शरद पवारांकडून संघाचे कौतुक करण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील यावर भाष्य केले आहे. कधीतरी प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करावे लागलते, तसे त्यांनी केले असे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. ‘राजकारणात काहीही होऊ शकतं, असं व्हावं असं बिलकूल नाही. ते होणं फार चांगलं आहे या मताचा मी नाही. राजकारणात हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणार नाही, असं मी म्हणतो, त्यावेळी राजकीय परिस्थिती कुठं नेऊन ठेवेल याचा भरवसा नाही’, असे वक्तव्य त्यांनी केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘शरद पवार अतिशय चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांनी नक्की याचा विचार केला असेल की आम्ही तयार केलेलं वायू मंडल एका मिनिटात पंक्चर झालं. हे करणारी शक्ती कोण? त्यांच्या लक्षात आलं की ही शक्ती नियमित राजकारण करणारी शक्ती नाही. ही राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. शेवटी प्रतिस्पर्ध्याचंही कधीतरी कौतुक करावं लागतं. त्यांनी तसं कौतुक केले असे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button