क्राइममहाराष्ट्र

सांगोला पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; आंध्र प्रदेशातील सोने चोरी प्रकरणातील संशयित जेरबंद 

सांगोला (प्रतिनिधी);-
आंध्र प्रदेशातील सोने चोरी प्रकरणातील संशयितास गोपनीय माहितीच्या आधारे, सांगोला पोलीस व आंध्र पोलीस पथकाने सांगोला बसस्थानक परिसरात फिरताना जेरबंद केले असून या कामगिरीमुळे सांगोला पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २७ जानेवारी रोजी आंध्र प्रदेश तील धर्मावरम फस्ट टाऊन पोलीस ठाणेकडील पो. हवालदार नागांजनेलू व पोलीस पथकाने धर्मावरम पोलीस ठाणे गु.र.नं. १७/२०२५ बी.एन.एस.२०२३ चे कलम ३१८ (४), ३१६ (४) प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्याकामी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये पो. नि. भीमराय खणदाळे यांची भेट घेतली.
सदर गुन्ह्यातील संशयित व्यक्तीचा सांगोला पोलिसांचे पथक व आंध्र प्रदेश पोलीस यांनी मिळून शोध घेत असताना, गोपनिय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, संशयित हा सांगोला एस. टी. स्टॅण्ड व आजूबाजूच्या परिसरात दिसून आला आहे.
तेव्हा तात्काळ सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन त्यास हटकले असता, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताच, त्यास पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून एकूण २४५.६५ ग्रॅम वजन असलेल्या सोन्याच्या लगड मिळून आल्या.
स.पो.नि. सचिन जगताप यांनी संशयित व्यक्ती व मिळून आलेले सोने आंध्र प्रदेश पोलीसांकडे पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. भीमराय खणदाळे, स. पो.नि. सचिन जगताप, पो.हे.कॉ. दत्ता वजाळे, विकास क्षीरसागर, पो.कॉ.मारुती पांढरे यांनी केली आहे.

कमलापूर येथील खुनाचा उलगडा आणि पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी

दिनांक १९ जानेवारी रोजी कमलापूर ता. सांगोला येथे झालेल्या खून प्रकरणातील मयताची ओळख पटवून गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘तीन तासाच्या’ आत खून प्रकरणाचा उलगडा करणाऱ्या सांगोला पोलिसांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत आंध्रप्रदेशातील सोने चोरी प्रकरणातील संशयितास जेरबंद केले आहे.
सदर खुन प्रकरण तपासाची कामगिरी, सोलापूर ग्रा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. बी. एस. खणदाळे, स.पो. नि. सचिन जगताप, पवन मोरे, पो. उपनिरीक्षक विनायक माहुरकर, पोपट काशीद, पो.हे.कॉ. दत्ता वजाळे, बापू झोळ, संतोष देवकर, पो.ना. धनंजय ईरकर, पो.कॉ.अमोल कुंभार, मारुती पांढरे, गणेश कुलकर्णी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापुर ग्रामीण आदी पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button