इतर

‘कोविड चीनच्याच प्रयोगशाळेत निर्माण झाला; अमेरिकेचा चीनवर निशाणा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. ट्रम्प सत्तेवर येताच अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने कोरोनाबाबत मोठा दावा केला आहे. कोरोना नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने म्हंटल्याने एकच खळबळ उडाली आहे. याद्वारे ट्रम्प यांनी येताच क्षणी चीनवर लक्ष केंद्रित केले आहे.

बायडेन प्रशासन आणि सीआयएचे माजी संचालक विल्यम बर्न्स यांच्या विनंतीवरून हा अहवाल तयार करण्यात आला होता. सीआयएने कोविड विषाणू निसर्गातून नाही तर प्रयोगशाळेत निर्माण झाला आहे, असा दावा केला. एजन्सीने या दाव्यांवर कोणतेही पुरावे सादर केले नाहीत.

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा मोठा दावा 

कोरोना विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतून चुकून बाहेर पडला किंवा नैसर्गिकरित्या उदयास आला याबाबत चिनी अधिकाऱ्यांकडून सहकार्याचा अभाव असल्याने या प्रश्नांची उत्तरे कधीच पूर्णपणे मिळणार नाहीत, असा दावाही गुप्तचर विभागाने केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सीआयए संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्या विनंतीवरून शनिवारी ते सार्वजनिक करण्यात आले.

मात्र चीनने अमेरिकेच्या अहवालाचे वर्णन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार अमेरिकेत सर्वाधिक झाला. अमेरिकेत लाखो लोकांनी प्राण गमावले. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही कोरोना व्हायरसला ट्रम्प यांनी ‘चिनी विषाणू’ असे संबोधून शी जिनपिंग सरकारवर आरोप केले होते.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे जगभरात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. लॉकडाऊन लावण्यात आल्याने अनेक देशांना याचा आर्थिक फटका देखील मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला होता. यानंतर आता सीआयएने केलेल्या करोनाबाबतच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button