शारीरिक शिक्षण विषय अभ्यासक्रमावर डॉ. कोटे यांनी केले मार्गदर्शन
बदनापूर : नवीन शैक्षणिक धोरणानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत बी ए प्रथम वर्ष शारीरिक शिक्षण विषय अभ्यासक्र शैक्षणिक वर्ष- २०२४-२५ पासून लागू करण्यात आल्याने संबंधित विषयात प्राध्यापकांना येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट अंतर्गत बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागामार्फत एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली असून या मध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील प्राध्यपकांनी सहभाग घेऊन विविध प्रश्न उपस्थित केले असता डॉ. शत्रूंजय कोटे यांनी मार्गदर्शन करून प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणले आहे, यंदा नवीन अभयसक्रम बी.ए. प्रथम वर्षासाठी लागू झाल्याने विषय शिक्षकांना अनंत अडचणी येत असल्याने त्या अडचणी सोडविण्यासाठी व कला शाखेतील शारीरिक शिक्षण विषयाचा प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम कसा असेल याची सविस्तर माहिती संबंधितांना व्हावी म्हणून निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा दोन सत्रात पार पडली.
सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ.देवेश पाथ्रीकर ,डॉ.वैशाली खापर्डे,डॉ.एम.ए.बारी,उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी डॉ.मोहम्मद अताउल्ला होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.शत्रूजन्य कोटे होते ,यावेळी व्य्स्पेथवर बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यलयाचे शरीरोइक शिक्षण संचालक डॉ.एस.एस.शेख,डॉ.पठाण झेड ए.,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.खान नाजमा उपस्थित होते. यावेलो डॉ.शत्रूंज्य कोटे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी शासनाच्या परिपत्रकाची सविस्तर माहिती देऊन उपस्थित शिक्षकांनी केलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली. तसेच दुपारच्या सत्रात डॉ.एम.ए.बारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा होऊन यावेळी देखील डॉ.कोटे यांनी मार्गदर्शन केले तद्नंतर कार्यक्रमच समारोप संस्थेच्या सचिव डॉ.एम.डि. पाथ्रीकर यांच्या उपस्थित पार पडला व उपस्थित शिक्षकांना डॉ.एम.डी .पाथ्रीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन मुणगे श्रीनिवास यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी प्रयत्न केले.