OYO हॉटेलमध्ये जाताय, तर अविवाहित जोडप्यांनी जाणून घ्यावा हा नविन नियम
मेरठ : अविवाहित जोडप्यासाठी हॉटेल म्हटलं की समोर येतं ते ओयो हॉटेल. कित्येक कपल सगळ्यात आधी ओयो हॉटेलला पसंती देतात. पण आता अविवाहित जोडप्यासाठी कंपनीने नवीन नियम लागू केला आहे. यानियमाअंतर्गत OYO हॉटेल्समध्ये अविवाहित जोडप्यांना एन्ट्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून हा नवीन नियम लागू होणार आहे.
OYO ने पार्टनर हॉटेल्ससाठी नवीन चेक-इन पॉलिसी सुरू केली आहे. या पॉलिसी अंतर्गत आता अविवाहित जोडपे OYO हॉटेलमध्ये चेक-इन करू शकणार नाहीत. याची सुरुवात उत्तर प्रदेशच्या मेरठमधून करण्यात आली असून त्यानंतर ती संपूर्ण देशात लागू केली जाण्याची शक्यता आहे. मात्र OYO ने हे पाऊल का उचलले? ते आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
OYO च्या नियमावलीत बदल
OYO च्या नव्या नियमावलीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांसह सर्व जोडप्यांना आता चेक-इनच्या वेळी त्यांच्या नातेसंबंधाचा वैध पुरावा सादर करावा लागेल. यासोबतच कंपनीने मेरठमध्ये हा नियम लागू केल्यानंतर त्याचा फीडबॅक आणि परिणाम पाहून देशातील इतर शहरांमध्ये हा नियम लागू करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
OYOने हे पाऊल का उचलले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ओयो म्हणाले, याआधी देखील ओयोला मेरठमधील काही लोकांनी या विषयावर अभिप्राय प्राप्त झाला आहे, ज्यामध्ये त्यांना अविवाहित जोडप्यांच्या चेक-इनबाबत कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय इतर काही शहरांतील लोकांनीही अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये चेक-इन करण्याची परवानगी न देण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
या धोरणांतर्गत आता जोडप्यांना हॉटेलमध्ये चेक इन करण्यासाठी नातेसंबंधाचा पुरावा दाखवावा लागणार आहे. केवळ ऑफलाइनच नाही तर ऑनलाइन बुकिंग करतानाही नातेसंबंधाचा पुरावा दाखवणे आवश्यक असेल. कंपनीने असेही म्हटले आहे की ओयोने आपल्या भागीदार हॉटेलांना स्थानिक सामाजिक संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांच्या निर्णयावर आधारित जोडप्यांची बुकिंग नाकारण्याचा अधिकार दिला आहे. या धोरणाच्या तज्ज्ञांनी सांगितले की, ग्राउंड फीडबॅकच्या आधारे कंपनी मेरठ व्यतिरिक्त इतर शहरांमध्ये याची अंमलबजावणी करेल.
OYO कंपनीला भारतासह परदेशातही पसंती
दरम्यान, OYO कंपनीचा उद्योग केवळ भारतातच नाही तर परदेशातही पसरला आहे. जवळपास 30 हून अधिक देशात कंपनीचे हॉटेल्स आणि होम स्टे सुविधा उपलब्ध आहे. ज्याचा अनेकांना फायदा होत आहे. मात्र नवं वर्षाच्या सुरुवातीलाच घेतलेल्या कंपनीने आपल्या निर्णयात केलेला बदल कितपत फायदेशीर ठरणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.