गोंधळ घालाल तर तडीपार व्हाल : पोलीस अधीक्षक संजय जाधव
धाराशिव :- सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून वेळोवेळी आरोपींना तडीपार केले जाते. असे असतानाही काही गावगुंड, गुन्हेगार, तडीपार आरोपी हे परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करतात, गोंधळ घालतात. मात्र नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पुढे शहराप्रमाणेच सामान्य जनतेला न्याय देणाऱ्या सक्षम कायदा सुव्यवस्थेद्वारे चांगले पोलिसिंग केले जाणार असून हितसंबंधातून चालणारे अवैध व्यवसाय, दबावतंत्रातून चालणारी ठेकेदारी, गुंडगिरी, खंडणीखोरी, भाईगिरी सारखी गुन्हेगारी प्रसंगी तडीपारी सारखी कडक कारवाई करुन मोडीत काढू. असा इशारा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिला आहे. त्या मुळे गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
आगामी काळात साजरा होणारा गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणाच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशममुख यांच्या उपस्थितीत (दि.९ सप्टेंबर) रोजी १७:१५ ते १८:३० वाजण्याच्या दरम्यान नळदुर्ग शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक मार्ग व ईद-ए-मिलाद जुलुसचा मिरवणुक मार्गावर ०५ पोलीस अधिकारी व २० पोलीस अंमलदार, ०१ एसआरपीएफ प्लाटुन व ३५ होमगार्ड सह रूट मार्च घेण्यात आला असुन नमुद दोन्ही सण-उत्सव दरम्यान उपद्रवी गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधक कार्यवाही तसेच तडीपारी सारखी कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तेव्हा सर्वांनी शांततेत सण-उत्सव साजरे करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक जाधव यांनी केले आहे.