महाराष्ट्रराजकारण

नरहरी झिरवाळसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील जाळीवर उडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ, आमदार राजेश पाटील, आमदार सुनील भुसारा, भाजप खासदार हेमंत सावरा यांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या घेतल्या. याप्रकारामुळे मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर आणि धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षणाला विरोधासाठी नरहरी झिरवाळ यांनी आक्रमक होत हा प्रकार केला.

सत्ताधारी पक्षात सहभागी असणारे आणि आदिवासी मंत्री नरहरी झिरवाळांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारली आहे. मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी उडी मारली. त्यांच्यासह आणखी दोन आमदारही होते. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी जाळीवर उड्या मारत आपला निषेध नोंदवला. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मूळ मागणी आमदारांची आहे. पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे.

आमदारांनी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवलं होतं. आदिवासी आरक्षणाअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये अशी या आंदोलनकर्त्या आमदारांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांची धावती भेट झाली.ते आज अॅटर्नी जनरल तुषार मेहतांशी बोलणार आहेत. परंतु आम्ही पेसा भरतीबाबत आग्रही आहोत. आम्ही काय करणार ते लवकरच समजेल. सरकार जसं बी प्लॅन सांगतंय, तसा आमच्याकडेही बी प्लॅन आहे. आम्ही एकत्र बसू आणि पुढील दिशा ठरवू असं नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं होतं.

दरम्यान मंत्रालयातील आंदोलनानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी आमची धावती भेट झाली. धावत्या भेटीत त्यांनी एकच सांगायला होतं की, आपलं ठरल्याप्रमाणे बी प्लॅन सुरु आहे. मुख्य सचिव किंवा त्याच्याशी ज्यांचा संबंध असेल, कायद्याशी संबंधितांकडून आजच्या आज आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यायला हरकत नाही असं वाटतं. आता त्यांनी ते करावं.

नरहरी झिरवाळ यांची नेमकी मागणी काय?
सरकारने धनगर सामाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीसाटी नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदारही आंदोलनात सहभागी झाले आहेत. ज्या समाजाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, त्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. पेसी भरतीच्या ऑर्डर तयार असताना कोर्टाच्या आदेशामुळे त्या देण्यात आलेल्या नाहीत असं झिरवळ म्हणाले होते.

झिरवाळ साहेबांनी कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये : गोपीचंद पडळकर
याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, आज इतक्या मोठ्या पदावर आहेत. सरकारचे जबाबदार प्रतिनिधी आहेत. त्यांनी असे पाऊल उचलण्याची आवश्यकता नाही. जो काही विषय होईल तो मुख्यमंत्री साहेबांच्या चर्चेतून सोडवला जाईल. इतकी टोकाची भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. सरकार आता बऱ्याच घटकांना न्याय देण्याच्या संदर्भात प्रयत्न करत आहेत. पेसासंदर्भात देखील सरकार चांगली भूमिका घेईल. त्यामुळे झिरवाळ साहेबांनी कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये, असे प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button