महाराष्ट्रराजकारण

मतदानातील तफावतबद्दल प्रकाश आंबेडकरांचे निवडणुक आयोगाला पत्र

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महायुतीने 230 जागांपर्यंत मजल मारली तर महाविकास आघाडीला 50 पर्यंतचा आकडा गाठनेही शक्य झाले नाही. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोळ करून ही निवडणूक जिंकली असल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांकडून ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली जात आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत निवडणूक आयोगाला पत्र लिहीले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (6 डिसेंबर) राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांना पत्र लिहिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यासाठी आंबेडकरांनी हे पत्र लिहिले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल चिंता व्यक्त करत पत्र लिहिले आहे. या पत्रात प्रकाश आंबेडकर यांनी तीन प्रश्न विचारले आहेत.

या पत्रात प्रकाश आंबेडकर यांनी तीन प्रश्न विचारले आहेत. मतदाराला त्याचे/तिचे/त्यांचे मत देण्यासाठी लागणारा वेळ किती? जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते संध्याकाळी 6 या वेळेत झालेल्या मतांची नोंद केली आहे का? आणि असल्यास, त्याचा तपशील काय?; जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग ऑफिसर यांनी 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:59 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का आणि असल्यास, त्याचा तपशील काय? असे तीन प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उस्थित केले आहेत.

आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी आम्हाला अशा आहे. कारण भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रिया आणि आचरणावरील घसरलेल्या आणि डळमळलेल्या विश्वासाची दखल घेतील, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला. यावर आता निवडणूक आयोग काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button