निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहीणाचा पुनर्विचार : फडणवीस
मुंबई : महायुतीच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झााले आहे. तर एकनाथ शिंदे आिण अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनले आहे. अशात निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली लाडकी बहिण योजना आता वेगळ्याच संकटात सापडली आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जांची उलट तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आल्या. लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल. या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, “सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहेत. तसेच महिलांना मिळणारा लाभ 2100 रुपये करणार आहोत. आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू. शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच, महिलांना 2100 रुपये मिळणार हे नक्की आहे. आम्ही जी आश्वासनं दिली त्या पूर्ण करणार आहोत. ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, त्या आम्ही आधी करू. छाननीबद्दल बोलायचं झालं तर निकषाच्या आत ज्या महिलांना लाभ मिळत असेल, त्यांना लाभ मिळेलच. पण काही महिलांना निकषाच्या बाहेर राहूनही लाभ मिळत आहे, अशा तक्रारी आलेल्या आहेत. तुम्हाला कल्पना असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली होती, तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला होता, असे समोर आले होते. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वत: समोर येऊन आम्ही निकषात येत नाहीत, असे सांगितले होते. त्यानंतर ती योजना स्थिर झाली. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल. या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेबाबत सांगितले की, ‘राज्यातील लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही. ज्यांचे अर्ज वैध आहेत. त्यांचे अर्ज बाद होणार नाहीत. कुणाला बाद करणार असे नाही. चुकीचे कागदपत्र नसावेत असे आहे.’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लाडक्या बहिणीबाबत मोठं वक्तव्य केले होते. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बजेटच्या वेळी लाडकी बहीण योजनेच्या रक्कमेबाबत विचार करू. बजेट ठरवताना आर्थिक स्रोत याबद्दल विचार करू.’, असं फडणवीस यांनी सांगितलं होतं.