क्राइमराजकारण

संकेत बावनकुळेच्या बिलात बीफ कटलेट… तो बारमध्ये दूध प्यायला गेला होता का?

मुंबई : नागपूरमध्ये सीताबर्डी येथे रविवारी मध्यरात्री घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले तापले आहे. अपघातातील गाडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांची आहे. झालेल्या अपघात प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. संकेत आणि त्यांचे मित्र ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्या बिलात बीफ कटलेटचा समावेश असल्याचा दावा राऊतांनी केला. आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांना श्रावण-गणपतीत गोमांस चालतं का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

फडणवीसांच्या नागपुरात एवढा मोठा अपघात झाला, १७-१८ जण हॉस्पिटलमध्ये आहेत. ज्याच्या मालकीचं वाहन आहे, त्याचं साधं नाव एफआयआरमध्ये नाही. प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवरुन अपघातानंतर त्याला बदलण्यात आलं, त्याला तुम्ही वाचवताय? तु्म्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाता करताय? त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं बिल मिळालेलं आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांचं बिल समोर आणलं पाहिजे. त्यात दारुचं बिल आहे. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात.. चिकन, मटण यांच्यासोबत बीफ कटलेटचंही बिल आहे.. गोमांस… श्रावण आहे, गणपती आहेत… आम्हाला हिंदुत्व शिकवतात? पोलिसांनी बिल जप्त केलंय. तुम्ही बिफ खायचं आणि लोकांचे बळी घ्यायचे.. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

तर याप्रकरणी संकेतने मद्यपान केलेलं नव्हतं असा संदर्भ चंद्रशेखर बावनकुळेंनी केला होता. याचा उल्लेख करत सुषमा अंधारे यांनी यालाच चांगलेच फटकारले.

दूध प्यायला गेला होता का?
रविवारी झालेल्या अपघाताच्या वेळी संकेतने मद्यपान केलेलं नव्हतं असा संदर्भ चंद्रशेख बावनकुळेंनी दिल्याचा उल्लेख करत सुषमा अंधारेंनी खोचक टीका केली आहे. “बावनकुळे, आपण म्हणता संकेत (मद्य) प्यायलेला नव्हता. संकेतचा मित्र (मद्य) प्यायला होता. मग संकेत बारामध्ये दूध प्यायला गेला होता का?” असा खोचक सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button