महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची दुसरी यादी जाहीर

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.

दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे-मतदारसंघ
एरंडोल-सतीश पाटील
गंगापूर-सतीश चव्हाण
शहापूर-पांडुरंग बरोरा
परांडा-राहुल मोटे
बीड-संदीप क्षीरसागर
आर्वी- मयुरा काळे
बागलाण-दीपिका चव्हाण
येवला-माणिकराव शिंदे
सिन्नर-उदय सांगळे
दिंडोरी- सुनीताताव चारोस्कर
नाशिक पूर्व-गणेश गिते
उल्हासनगर-ओमी कलानी
जुन्नर-सत्यशील शेरकर
पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
खडकवासला-सचिन दोडके
पर्वती- अश्विनी कदम
अकोले- अमित भांगरे
अहिल्यानगर शहर-अभिषेक कळमकर
माळशिरस-उत्तम जानकर
फलटण-दीपक चव्हाण
चंदगड-नंदिनी बाभूळकर
इचलकरंजी-मदन कारंडे

या पत्रकारपरिषदेत जयंत पाटील म्हणाले, लाडक्या बहि‍णींना निवडणुकीपुरतेच गोंरजण्याचे काम सुरू आहे. जयश्री थोरात यांच्याबद्दल जे विधान करण्यात आले ते अत्यंत दुर्दैवी होते. लाडक्या बहिणींना कसे वागवले जाते हे राज्याने पाहिले.

कापूस आणि सोयाबिणचे मोठे नुकसाने झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. मात्र महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही, आज दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, तर दुसऱ्या यादीमध्ये आता 22 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत एकूण 67 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button