यामुळे नाही आले लाडकी बहीण योजनेचे पैसे
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जवळजवळ ४८ लाख महिलांना याचा लाभ मिळाला आहे. परंतु या तीन प्रमुख कारणांमुळे काही महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत.
याेजनेसाठी सरकारने ८० लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांतरित केला आहे. दरम्यान, या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत. पण यातील लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत तर काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही.
ही आहेत कारणे :-
१७ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी
१४ ऑगस्टला अनेकींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. राज्य सरकारने १७ ऑगस्टपर्यंत पैसे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. त्यामुळे ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील त्यांना १७ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल.
बँक खाते आधारची लिंक नसणे
बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. १७ तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे.
अर्ज छाननी न झाल्याने
तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. पण तुमच्या अर्जासमोर पेंडिग, रिव्ह्यू (Review), डिसअप्रूव्ह (Disapproved), असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आहे. त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही १७ तारखेपर्यंत वाट पाहायला हवी. १७ तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात.