देश-विदेशराजकारण

बार असोसिएशन अध्यक्षांनी भाजप आमदाराच्या कानाखाली खेचली

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक व्यवस्थापन समितीच्या असल्याचे दिसत आहे. आज बुधवारी बार असोसिएशनचे अध्यक्ष अवधेश सिंह यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश वर्मा यांना चापट मारली आहे. आता यादरम्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अवधेशला चापट मारल्यानंतर आमदार समर्थकांनी अवधेशलाही मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

हा वाद अशावेळी समोर आला आहे. जेव्हा भाजपचे लखीमपूर युनिटचे जिल्हाध्यक्ष सुनील सिंह आणि योगेश वर्मा यांचे पत्र व्हायरल झाले. त्यात त्यांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, निवडणूक पुढे ढकलण्यात येणार नसल्याचे एडीएम संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी कोणीतरी मतदार यादी फाडल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.

दरम्यान, या निवडणुकीची प्रक्रिया 14 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होणार होती. माहितीनुसार, मतदान करणारे 12 हजार भागधारक आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार होती आणि 10 तारखेला अर्ज माघारी घ्यायचे होते, 11 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार होते.

या सगळ्या दरम्यान एडीएम संजय सिंह म्हणाले की,’निवडणुका वेळेवर आणि निष्पक्ष प्रक्रियेने होतील. तर दुसरीकडे आमदार योगेश वर्मा यांनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला आहे.’

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button