क्राइम

अनैतिक संबंधात अडथळा आणणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून, केला अपघाताचा बनाव

धामणगाव रेल्वे : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव शिवारात अनैतिक संबंधातून एकाचा खून करण्यात आला. सदर आरोपीने मयतास स्वत:च्या शेतात दारु पिण्यासाठी पार्टीच्या बहाण्याने घेऊन जाऊन त्याने खून केला व नंतर अपघाताचा बनाव करणाऱ्या त्या आरोपीस पोलीसांनी अवघ्या दोन ते तीन तासांत बेड्या ठोकल्या असुन गजाआड केले आहे. सदर गुन्हा हा तळेगांव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असुन पत्नी अनैतिक संबंधात अडचण होत असल्याने केल्याची कबुली आरोपीनी तलेगांव दशासर पोलीसांना दिली आहे.

तळेगांव दशासर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधावारी २९ जाने रोजी रात्री ९ च्या सुमारास तळेगांय दशासर पोलीसांना निमगव्हाण फाटा भवानी मंदीराजवळ मनोज वामनराव नागापुरे (वय ४० रा. तळेगलंव दशासर) याचा अपघात झाल्याची माहिती मिळाली ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली यावेळी मृतक मनोज स्कुटीचे व सीटचे व ह:न्डलचे मधल्या जागेत दबलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आला. त्याचे डोक्याला जखमा होत्या पण गाडीला मात्र कोणतीही तुटफुट झाली नसल्याने प्रथमदर्शनीच तो अपघात नसुन खुन असल्याची खात्री पटली. पुढील चौकशीत अवघ्या २ तासांतच परिस्थितीजन्य पुरावे व बयांणावरुन आरोपी उमेश शिवा शिंदे याला चौकशी करीता तळेगांव पोलीस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीनी स्वत: खून केल्याचे कबूल केले.

मनोज नागापुरे च्या महिला नातेवाईकाशी उमेश शिंदे याचेशी अनैतिक संबंध होते. दरम्यान याच कारणाने मनोज आपल्या पत्नीस मारहाण करीत होता. त्या दोघांचे उमेश शी असलेल्या अनैतिक संबंधावरुन निरंतर खटके उडत होते. दरम्यान मनोज चा मोठा भाऊ सुनिल याने उमेशची समजूत घालण्याच प्रयत्न केला मात्र  उमेश ने त्याला सुध्दा पाहून घेण्याची धमकी दिली होती. या वादामुळे सुनिल नागापुरे तीन वर्षापुर्वीच गाव सेाडून गेला होता. उमेश व तिच्या अनैतिक संबंधाला  पती मनोज अडसर होत असल्याने त्याला संपविण्याचा उमेशने कट रचला बुधवारी ता. २९. रोजी राथी ९ च्या सुमारास उमेश दारु पिण्याच्या बहाण्याने तो मनोजला घेऊन स्वतच्या शेतात गेला.

मद्यधुंद होईपर्यंत थांबला व तो बेसावध असतांना त्याचे डोक्यावर लोखंडी गजगोटयाने जबबर प्रहार करुन मनोजला जिवानिशी ठार केले. यावेळी त्याने मनोजच्या डोक्यावर ६ वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेला त्याचा मृतदेह त्याच्याच स्कुटी क्र. एमएच २७ सी आर ३७५० वर स्कुटीचे व सीटचे व हॅन्डलचे मधल्या जागेत ठेऊन नागपुर औरंगाबाद सुपर एक्सप्रेस हायवेवर असलेल्या निमगव्हाण फाट्यावर भवानी मंदीराजवळ नेऊन टाकले व रस्ते अपघाताचा बनाव करुन उमेश घटनास्थळावरुन पसार झाला.

सदर प्रकरणी तळेगांव दशासर पोलीसांनी आरोपी उमेश शिंदेला ताब्यात घेतले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील चौकशी केली असता उमेश शिंदे यानेच मनोज नागापुरे यांची हत्या करुन रस्त्याच्या कडेला आणून टाकल्याची कबुली दिली. तळेगांव दशासर पोलीसांनी आरोपी उमेश ला अटक केली असुन न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button