हा नेता राहिल शरद पवारांच्या मनातील मुख्यमंत्री, अप्रत्यक्ष केले वक्तव्य

सांगली: शरद पवारांनी सांगलीतील इस्लामपूरमधून भाषण करताना जयंत पाटलांनी महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी, असं सूचक विधान केलं. त्यामुळे पवारांनी अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा. जाहीर पाठिंबा देतो, उद्धव ठाकरे सातत्यानं घेत आहेत. यातच पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
दिग्गज नेते साथ सोडून गेल्यावरही जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांसोबत राहिले. ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून सातवेळा विजयी झालेले आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला १० पैकी ८ जागा मिळाल्या. काल इस्लामपुरातील जाहीर सभेत शरद पवारांनी जयंत पाटलांचं तोंड भरुन कौतुक केलं. महाराष्ट्राला पुढे नेण्याची शक्ती जयंत पाटलांमध्ये आहे. पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो, साखळ गावातून उद्या महाराष्ट्र घडवण्याची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र उभारण्याची, सावरण्याची आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या सुपुत्रावर मी टाकणार आहे, असं पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला. काँग्रेस, ठाकरेसेनेनं थेट मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यास सुरुवात केली. पण यापासून शरद पवार चार हात लांब राहिले. पण आता त्यांनी थेट जयंत पाटील यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.