क्राइम

वाल्मिक कराडचा मुलाने स्वत:च्याच मॅनेजरला लुटले, महिलेची तक्रार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केल्याप्रकरणी सध्या वाल्मिक कराड हे नाव चांगलंच चर्चेत आले आहे. मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड सध्या खंडणीच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत आहे. या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडाविरोधात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. यातच आता त्याचा मुलगा सुनिल कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?
तक्रारदार महिलेच्या मते, सुशील कराड आणि त्याच्या दोन साथीदारांनी (अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार) तिच्या पतीवर सतत दबाव टाकला. पीडित महिलेचा पती सुशील कराडसाठी काम करीत होता. मात्र, सुशील त्याला सतत “तू इतके पैसे कसे कमावलेस?” अशी विचारणा करत मारहाण करीत असे.

यानतंर या तिघांनी त्याचे राहतं घर आणि जागा अनिल मुंडे याच्या नावावर करुन घेतली. त्याच्या दोन ब्लकर ट्रक आणि दोन गाड्या यांच्या चाव्या तसेच त्याची कागदपत्र त्याच्याकडे ठेवली. इतकंच नव्हे तर त्याने पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळे सोने परळीतील ज्वेलर्सला विकून त्याच्याकडून पैसे घेतले. ते पैसे त्याने स्वत:कडे ठेवले. परत त्याला मारहाण करत तू इतके पैसे कसे कमवले अशी विचारणा केली.

महिलेच्या मुलांवरही अत्याचार
यानंतर त्या पीडित महिलेने वाल्मिक कराड यांचीही भेट घेतली. पण सततची मारहाण आणि रिव्हॉलव्हरच्या धाकाला कंटाळून भीतीपोटी पीडित महिला, तिचा पती आणि तिची दोन मुले सोलापुरात आले. यादरम्यान परळीत पीडित महिलेच्या मुलीला सुशील कराडने मारहाण केली होती. तसेच पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचीही तक्रार या महिलेने केली आहे.

पोलिसांनी दखलच घेतली नाही
पिडीत महिलेने सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर सीपी ऑफिस, आणि बीड एसपी ऑफिस येथे RTED ने तक्रार केली होती. त्यासोबत गाड्यांचे सध्याचे लोकेशन कुठे आहे, हे देखील पाठवले. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याने तक्रारीची साधी दखलही घेतली नाही, असा दावा महिलेने केला आहे. शेवटी तिने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली.

सुनावणी १३ जानेवारीला
तक्रारीवर आधारित न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागवले होते. मात्र, काल होणारी सुनावणी आरोपीच्या वकिलाच्या गैरहजेरीमुळे पुढे ढकलली गेली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी येत्या १३ जानेवारीला होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button