देश-विदेश

हिजाबचं बंधन असलेल्या कट्टर इस्लामिक देशात महिला ब्रा अन् अंडरपँटमध्ये सार्वजनिक चौकात, व्हिडीओने जगभर खळवळ

इस्लािमक राष्ट्रामध्ये महिलांवर सामाजिक बंधने आहे. त्यात त्यांनी असे राहावे, काय खावे, कसे वागावे यापासून कोणते कपडे घालावे यावरही निर्बंध आहे. मात्र इराणमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. इराणमधील महिलांना हिजाबचं बंधन आहे. मात्र येथील एका तरुणीने या बळजबरीला विरोध करत अनोख्या पद्धतीने नोंदवलेला निषेध जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. हिजाबच्या सक्तीला विरोध करण्यासाठी एक तरुणी आपल्या अंगावरील दोन कपडे वगळता सर्व कपडे काढून सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना दिसली. सध्या इराणमधील हुकुमशाही पद्धतीच्या वर्तवणुकीविरोधात महिलांनी उचलेलं हे सर्वात मोठं पाऊल असल्याचा दावा करत या महिलेचे फोटो आणि व्हिडीओ जगभरामध्ये शेअर केले जात आहेत.

इराणमध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी योग्य पद्धतीने कपडे परिधान केले आहेत की नाही हे पाहण्यासाठी मॉरल पोलीस नियुक्त केले जातात. महिलांच्या शरीराचा एखादा भाग जरी दिलसा तरी त्यांना या मॉरल पोलिसांकडून दंड केला जातो किंवा शिक्षा केली जाते. तेहरान विद्यापीठामधील एका तरुणीला हिजाबच्या मुद्द्यावरुन मॉरल पोलिसांच्या तुकडीने हटकले. त्यामुळे संतापलेल्या या तरुणीने विरोध केला. या झटापटीमध्ये तिचा बुरखा फाटला. या प्रकारामुळे चीड आलेल्या तरुणीने असल्या निर्बंधांना विरोध करण्यासाठी आपली पॅण्टही काढली आणि ती सार्वजनिक ठिकाणी आधी बराच वेळ अंडरपँट आणि ब्रा घालून बसून राहिली. त्यानंतर ती बराच वेळ या ठिकाणी फेऱ्या मारताना दिसली. तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

विद्यापीठाचे प्रवक्ते अमीर महजोब यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन, “पोलीस स्थानकामध्ये या मुलीला मानसिक समस्या असल्याचं समोर आलं आहे,” असं सांगितलं.

अनेकांनी या महिलेला कोणताही मानसिक आजार नसून तिने बुरख्यासंदर्भातील कठोर निर्बंधांना विरोध करण्यासाठी हिजाब फाटल्यानंतर आपली पॅण्ट काढून विरोध नोंदवल्याचा दावा केला आहे. एका महिलेने या व्हिडीओवर कमेंट करताना, “सार्वजनिक ठिकाणी महिलेला अंडरपॅण्टवर फिरावं लागण्यासारखी कोणतीही वाईट गोष्ट नाही. हिजाबची बंधनं घालणं हे अधिकाऱ्यांच्या मूर्खपणाचं लक्षण आहे,” असं म्हटलं आहे.

महिलांच्या हक्कांच्या बाजूने लढणाऱ्या अनेकांनी या महिलेच्या शौर्याचं कौतुक केलं आहे. या महिलेचं आता काहीतरी बरं वाईट होणार अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. इराणमध्ये यापूर्वी 2022 साली हिजाबविरोधात मोठं हिंसक आंदोलन झालं होतं. त्याची दखल जगभरातील देशांनी घेतली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button