महाराष्ट्रराजकारण

मते दिले नाही तर लाडक्या बहिणीकडून 3000 वसुल करणार

कोल्हापूर : महायुती सरकारची गेंमचेंजर असलेली योजना म्हणजे लाडकी बहिण योजना. महायुतीची ही निवडणुक सध्या या योजनेभोवतीच फिरत आहे. सर्वच फिस्त या योजनेवर असल्याचे निवडणुकीत बघावयास मिळते. काही दिवसापूर्वी रवि राणा यांनी मते न देणाऱ्या लाडक्या बहिणीकडून पैसे वसूल केले जातील, असे म्हटले होते. त्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता पुन्हा कोल्हापूर भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

त्या म्हणाल्या की, 1500 दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर 3000 वसुल करणार अस वक्तव्यं केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे.करवीर पन्हाळा गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गारीवाडे इथं आयोजीत करण्यात आलेल्या सभेत भाजपच्या महिला पदाधिकारी मेघारानी जाधव यांनी हे वक्तव्य केले आहे.

या मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी स्वर्गीय पी.एन. पाटील यांचे पूत्र राहुल पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके यांच्यात मुख्य लढत होणार आहे. कोल्हापूरातील सर्वात मोठा मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो. लोकसभा निवडणूकीत याच मतदार संघातून शाहू महाराज यांना 70 हजाराचे लीड मिळाले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीत मतदार कोणाला मत देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button