महाराष्ट्रराजकारण

बलात्कारानंतर जांघेत खिळे ठोकले, मणिपूरमध्ये थर्ड डिग्री अत्याचार पाहून डॉक्टरही हळहळले

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षापासून मणिपूर हे हिंसाचाराने होरपळत आहे. मागच्या वर्षी दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढल्याची घटना घडली होती. आता जवळपास दीड वर्ष उलटत आलं तरी मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. दरम्यान, आता त्यापेक्षा भयानक घटना मणिपूरमध्ये घडली आहे.

मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात तीन मुलांची आई असलेल्या महिलेला जिवंत जाळण्यात आले. महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे समोर आले आहे ते धक्कादायक आहे. तिला ठार मारण्यापूर्वी तिच्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या होत्या. पीडित तरुणी जिवंत असताना तिच्या शरीरावर नखांनी भोसकले होते. थर्ड डिग्री टॉर्चर देण्यात आले. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर महिलेला जिवंत जाळण्यात आले. मणिपूरमधील जिरीबाम येथे तीन मुलांची आई असलेल्या एका ३१ वर्षीय आईवर बलात्कार झाला. त्यानंतर सशस्त्र घुसखोऱ्यांनी त्यांच्या गावातील घराला आग लावली. तिला जिवंत जाळण्यात आले. त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर या घटनेची भीषणता आणखीनच वाढली.

तीन मुलांच्या आईवर कथित बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आले. इतकंच नव्हे तर महिलाचा जिवंत जाळण्याआधी तिच्या शरीरावर खिळे ठोकले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर, महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरही ही घटना पाहून थक्क झाले होते.

मणिपुरमधील जिरीबाम येथे 31 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना डॉक्टरांनाही धक्का बसला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. रिपोर्टनुसार, महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्या शरीरावर ठिकठिकाणी खिळे ठोकण्यात आले. इतकंच नव्हे तर नराधमांनी तिला जिवंत जाळले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या शरिराचा अर्ध्याहून अर्धा भाग होरपळला होता त्यामुळं असं वाटत होतं की आम्ही राखेचे शवविच्छेदन करत आहोत.

जिरीबाम येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, तिच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला त्यानंतर आमच्याच घरात तिची हत्या करण्यात आली. त्यारात्री जैरावनमध्ये 17 घरांमध्ये लूटपाट आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. यामागे एखाद्या संघटनेतील सदस्य असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

शवविच्छेदन अहवालानुसार, डाव्या पायाचा काही भाग होरपळला होता. तर, डाव्या जांघेच्या मध्यभागी खिळे ठोकण्यात आले होते. शरीर 99 टक्के होरपळलं होतं. इतकंच नव्हे तर हाडेदेखील जळले होते. महिलेची अवस्था पाहून डॉक्टरांचे मनदेखील हेलावले होते. महिलेचा मृतदेह पाहूनच तिने कीती वेदना सहन केल्या असतील याचा अंदाज येत आहे. दरम्यान, महिला जेव्हा आगीत होरपळली होती तेव्हा तिचे पती आणि मुलं कशी बचावली, याची अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button