असुरांचा संहार करण्यासाठी, मशाल हाती दे… ठाकरे गटाचं प्रचाराचं नारळ फुटलं, उद्धव ठाकरेंच्या हस्ते गीत लाँच

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून नवं गाणं लाँच करण्यात आले आहे. ‘मशाल’ हाती दे…असे या गाण्याचे हे बोल आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या गाण्याचे लाँचिंग करण्यात आले आहे.
येत्या काही दिवसांत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाने त्यांचे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘मशाल हाती दे’ या गाण्याचे हे बोल आहेत. हे गाणे ऑडिओ स्वरूपात आहे. प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी ‘मशाल हाती दे’ हे गाणे गायले आहे. आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. याचनिमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे ‘गोंधळ गीत’ लॉंच करण्यात आले.
पितृपक्ष संपताच शिवसेना ठाकरे पक्ष ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून उद्धव ठाकरे ॲक्शनमोडमध्ये आले आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे. तर आजपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. मी आपल्या माध्यमातून तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरेप्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोत. आजपासून नवरात्र सुरू होत आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे आजची राजकीय पत्रकार परिषद नाही. राज्यात अराजकता आहे. त्यावर एक गाणे आहे. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. अराजकतावादी शिवाजी महाराज त्यांच्या कारकिर्दीत सत्तेवर आले. तेव्हा एकनाथांनी बये दार उघड आरोळी मारली होती. या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं ऑडिओ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी न्यायालयावर विश्वास ठेवत असतानाही न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. “गेले दोन वर्षे आम्ही न्यायमंदिराची दार ठोठावत आहोत, मात्र अजूनही न्याय मिळालेला नाही. वारेमाप भ्रष्टाचार होत आहे आणि कोणी त्राता नाही,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जगदंबेच्या आशीर्वादाची प्रार्थना करत “आई दार उघड” हे शब्द उच्चारले.
उद्धव ठाकरे यांनी या गाण्याला राजकीय नसलेले असे म्हटले आहे. “हे गाणे आमच्या राजकीय लढाईचा भाग नाही, मात्र राज्यातील अस्थिरतेला उत्तर देणारे आहे. महिलांच्या हाती मशाल देत आम्ही पुढे जाणार आहोत,” असे त्यांनी जाहीर केले.
दसऱ्याच्या मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठ्या उत्साहाने सांगितले की, “या मेळाव्यात आम्ही शहांचा फडशा पाडणार आहोत. मित्र विसरायचे दिवस आले आहेत, पण मी माझे मित्र विसरणार नाही,” असा मिश्किलपणे इशारा देत त्यांनी आगामी निवडणुकीची रणधुमाळी अधिकच वाढवली आहे.