क्राइममहाराष्ट्र

इनोव्हाने दुचाकीला उडवले, हिप्परगा येथील युवराज जाधव यांचा अपघाती मृत्यू

धाराशिव (प्रतिनिधी) : लोहारा तालुक्यातील हिप्परगा येथील युवराज जाधव (वय 65 वर्षे) हे शनिवारी दिवाळी पाडव्यानिमित्त दुचाकीवरून मुलीकडे जात असताना तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सांगवी काटी पाटी जवळ पाठीमागून आलेल्या भरधाव ‘इनोव्हा’ वाहनाच्या च्या धडकेत त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या मध्ये जाधव यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज बाबु जाधव, (वय 65 वर्षे), रा.हिप्परगा (रवा) ता.लोहारा जि.धाराशिव हे (दि.02 नोव्हेंबर) रोजी सकाळी 10.00 वा.सु. मोटरसायकल (दुचाकी) क्र.एमएच 25 ए.टी.1357 वरुन सांगवी काटी पाटी येथुन जात होते. दरम्यान इनोव्हा क्र.एमएच 12 जी.एफ. 6212 चा चालक आरोपी नामे-अनंत पांडुरंग झुंजार, रा.जवाहर नगर रोड, खार पूर्व मुंबई, ह.मु. कात्रज अंबेगाव, राम मंदीर कात्रज पुणे, यांनी त्यांच्या ताब्यातील इनोव्हा ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून युवराज जाधव यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात युवराज जाधव हे गंभीर जखमी होऊन मयत झाले.

 

अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विजय बाबु जाधव, (वय 65 वर्षे), रा.हिप्परगा (रवा) ता.लोहारा, जि.धाराशिव यांनी शनिवार, (दि.2 नोव्हेंबर) रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125 (बी), 106 सह 184 मो.वा. कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ऐन पाडव्या दिवशीच झालेल्या अपघाती निधनाने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने आमचा आधार गेल्याचे सांगत कुटुंबियांनी टाहो फोडला. शांत, संयमी, आणि मनमिळावू स्वभाव या मुळे ते पंचक्रोशीत ओळखले जात असल्याने नागरिकांसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे तीन भाऊ, एक बहीण, दोन मुली, एक मुलगा, आई, पत्नी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button