देश-विदेशराजकारण

बांगलादेशाने पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराला म्हटले देशाचा भाग; विवादित नकाशा जारी

ढाका : भारत आणि बांगलादेश संबंध अधिकच बिघडत चालले आहेत. दरम्यान बांगलादेशने आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे ‘सल्लागार’ म्हणून कार्यरत महफूज आलम यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी 16 डिसेंबर 1971 च्या विजय दिवसाच्या निमित्ताने भारताविरोधात एक मोठे वक्तव्य केली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांनी विजय दिवस हा बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील पाकिस्तानी सैन्यावर झालेल्या विजयाचा दिवस असल्याचे म्हटले आहे.

पोस्टमध्ये महफूज आलमने ईशान्य आणि उत्तर भारतात सांस्कृतिक असंतोष भडकवण्याचा प्रयत्न केला. यासोबतच एक वादग्रस्त नकाशा देखील त्यांनी प्रसिद्ध केला ज्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा बांगलादेशचा भाग दाखवण्यात आला होता. वाद वाढल्यानंतर महफूजने त्याची पोस्ट डिलीट केली असल्याची माहिती समोर आली आहे.

महफूज आलम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की, “ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील लोकांची संस्कृती धर्माची पर्वा न करता समान आहे. भारतातील उच्चवर्णीय आणि ‘हिंदू कट्टरतावाद्यां’च्या वृत्तीमुळे पूर्व पाकिस्तानची निर्मिती झाल्याचा आरोपही त्यांनी केला. महफूजने आपल्या पोस्टमध्ये 1975 आणि 2024 च्या घटनांची पुनरावृत्ती करण्याची गरज व्यक्त केली.

1975 आणि 2024 चा संदर्भ
1975 मध्ये बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली होती. महफूज यांनी 2024 मध्ये शेख हसिना यांना सत्तेवरून हटवण्याची कथित योजना अलोकतांत्रिक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “या घटनांमध्ये 50 वर्षांचे अंतर आहे, परंतु परिस्थिती बदललेली नाही. बांगलादेशला नवीन व्यवस्था आणि भूगोलाची गरज असल्याचा दावा महफूज यांनी केला.

वादग्रस्त नकाशा आणि धमकीची चर्चा
महफूजने फेसबुकवर एक वादग्रस्त नकाशा शेअर केला आहे, “ज्यात भारताचा पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम बांगलादेशचा भाग आहे. ते म्हणाले की,” बांगलादेश अजूनही त्याच्या “मुक्तीच्या शोधात” आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. मात्र, भारत काबीज करण्याचे स्वप्न शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी शांतपणे पोस्ट हटवली असल्याची महती समोर येत आहे.

महफूज आलमची पार्श्वभूमी आणि वाद
महफूज आलम हा कट्टर इस्लामी नेता असून त्याने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये मंत्री-स्तरीय सल्लागार म्हणून काम केले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या उपस्थितीत शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यासाठी युनूसने महफूजला ‘काळजीपूर्वक आखलेल्या’ ऑपरेशनचा मास्टरमाइंड म्हणून वर्णन केले.

2016 मध्ये विद्यापीठ सोडलेला महफूज स्वत:ला विद्यार्थी नेता म्हणवतो. भारतविरोधी भावना भडकवण्याचा आणि कट्टरपंथी इस्लामला पाठिंबा देण्याचा त्यांचा हेतू स्पष्टपणे त्यांची विधाने आणि क्रियाकलाप दर्शवतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button