अनोळखी व्यक्तीचा गळा दाबून खून; हातावर कृष्णाचे चित्र
चिंचोली तलावात मृतदेह आढळला ; सांगोला पोलिसांचे आवाहन
सांगोला : प्रतिनिधी
मौजे चिंचोली ता. सांगोला येथील तलावात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणासाठी अनोळखी इसम पुरुष जातीचे वय अंदाजे ४० ते ५० वय, याचा गळा दाबून किंवा कशाने तरी गळा आवळून सदर अनोळखी इसमाचा खुन करुन पुरावा नाहीसा करण्याच्या हेतूने, प्रेताची विल्हेवाट लावण्याचे उद्देशाने चिंचोली गावचे तलावातील पाण्यात सदरचे अनोळखी मयताचे प्रेत टालुन दिले आहे. सदर व्यक्तीच्या
उजव्या हातावर बासरी वाजणाऱ्या कृष्णाचे चित्र गोंदले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०३, २३८ प्रमाणे सांगोला पोलीसात गुन्हा दाखल केलेला आहे.
सदर मयत व्यक्तीबाबत व आरोपीबाबत काही माहिती असल्यास, तपास अधिकारीः पोलीस निरीक्षक बी. एस. खणदाळे, सांगोला पोलीस ठाणे ( मो.नं. 9822500318), स. पो. नि. पवन मोरे (मो.नं. 9552540369), पो. सई विनायक माहुरकर (मो.नं. 8888058972) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.