मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर आज पहाटेच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीला बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात येणार आहे. सैफवर तीन जणांनी हल्ले केले होते. यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर इतर दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
सैफ अली खानच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील लोकांनी आरडाओरड सुरु केली. यावेळी चोराने पकडले जाण्याच्या भीतीने चाकूने सैफ अली खानवर वार केला आणि तेथून चोराने पळ काढला. या हल्ल्यात सैफ अली खानला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हल्लेखोराने सैफच्या पाठीत धारदार शस्त्राने वार करण्यात केला. तसेच त्याच्या मानेजवळ 10 सेमीची जखम झाल्याची माहिती आहे. याशिवाय त्याच्या हातावर आणि पाठीवर अनेक वार करण्यात आले. यामुळे खूप रक्तस्त्राव झाल्याने मध्यरात्री त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आला. त्यानंतर इमारतीच्या नजीक पोहोचल्यानंतर त्याने दुसऱ्या एका इमारतीत शिरूर सैफच्या इमारतीत शिरकाव केला. इमारतीत जरी चोरटा शिरला असला तरी त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा आहे. इमारतीच्या लिफ्टमधून प्रवास करायलाही ॲक्सेस कार्डचा वापर करावा लागतो. त्यात इमारतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे सहजासहजी इमारतीच्या आत शिरणे सोप्पे नाही आहे. मात्र चोरट्याने सैफच्या घरात शिरण्यासाठी इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केला.
सैफ अली खानच्या घरात तीन हल्लेखोर शिरले होते. यापैकी एका हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अद्याप दोन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.