
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर रात्री चोरट्याने घरात घुसून हल्ला केला. हल्ल्यानंतर सैफ अली खानला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी मुंबई तसेच राज्य हे सुरक्षित नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. मात्र यात महाराष्ट्र करनी सेनेनं वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी प्रतिक्रिया दिली की, हिंदू कलाकारांना टार्गेट करून त्यांना फिल्म लाईनमध्ये कामं न देण्याचे निर्देश फिल्म निर्मात्यांना देण्यात येत होते, म्हणून यामध्ये सलमान खान, सैफ अली खान हे टार्गेटवर आलेले आहेत.
सैफ अली खानवरच्या हल्ल्यानंतर वांद्र्यातील सुरक्षा ऐरणीवर?
सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता वांद्र्यमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुरूवातील अभिनेता सलामान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणानंतर बाबा सिद्दीकींची हत्याही वांद्रेमध्येच झाली. यानंतर आता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यामुळे वांद्रे अनसेफ आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या 7 टीम दाखल
सैल अली खान हल्ला प्रकरणात तपासाला वेग आला असून तपासाठी पोलिसांना सात टीम दाखल झाल्या आहेत. महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात हल्लेखोर घरात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एन्ट्री दिली असून या आरोपीनं मदतनीसावर हल्ला केला. आणि या वादात सैफमध्ये पडला यातून सैफवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. वांद्रेमधील राहत्या घरात त्याच्यावर हल्ला झाला आहे. त्याच्यावर लीलावतीत शस्त्रक्रिया झाली असून चाकून त्याच्यावर 6 वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यामध्ये त्याच्या मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली. हात आणि पाठीवरही वार करण्यात आले आहेत. पाठीत धारदार शस्त्र खुपसण्यात आलं असून सैफवर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.