वाय प्लस सुरक्षा भेदून सलमान खानच्या सेटवर व्यक्तीची घुसखोरी
मुंबई : मुंबईमधील झोन-5 अिभनेता सलमान खान शुटींग करत असताना एक व्यक्तीने शुटींगच्या सेटवर घुसखोरी केली. त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेऊन त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. धमकी देत ती व्यक्ती म्हणाली ‘मी बिश्नोईला काय सांगू का?’ संबंधित संशयित व्यक्तीला चौकशीसाठी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सलमान खानचा जवळचा मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची यावर्षी 12 ऑक्टोबरला हत्या झाली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. तसेच सलमान खानच्या घरावर लॉरेन्स बिश्नोई गँगने 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी 72 तासांमध्ये आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. त्यानंतर सलमान खानला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ही सुरक्षा कवच भेदून संबंधित व्यक्ती सलमानच्या सेटवर पोहाेचल्याने खळबळ माजली आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांना न जुमानता सलमान खानने आपले काम सुरूच ठेवले आहे. याआधी तो त्याच्या बिग बॉस 18 च्या रिॲलिटी शोच्या शूटिंगला कडक सुरक्षेमध्ये परतला असताना, त्याने सिंघम अगेनसाठी एक कॅमिओ देखील शूट केला. यासोबतच सलमान खानने त्याच्या आगामी सिकंदर या चित्रपटाचे शूटिंगही सुरू ठेवले आहे.