मनोरंजनमहाराष्ट्र

स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून गोळी सुटून अभिनेता गोविंदा जखमी

अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याची बातमी समोर आली आहे. स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली आणि ती गोविंदालाच लागली आहे. यामुळे गोविंदा जखमी झाला आहे. अभिनेता गोविंदाला क्रिटी केअर हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे.

गोविंदाच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. चित्रपट अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याची बातमी समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. गोविंदाकडून स्वतःच्याच रिव्हॉल्व्हरने पायात गोळी झाडली गेली असल्याच सांगण्यात येत आहे. रिव्हॉल्व्हरचे कुलूप उघडे असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मॅनेजर शशी सिन्हा यांची माहिती

अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदा कोलकात्याला रवाना होण्याच्या तयारीत होता. त्या दरम्यान, परवाना असलेला रिव्हॉल्व्हर ठेवत असताना हातातून पडली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली, अशी माहिती गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिली आहे. पुढे ते म्हणाले की, डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. तो सध्या रुग्णालयात आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

गोविंदाची प्रतिक्रिया

गोविदांने पायाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदा प्रतिक्रया दिली आहे. यामध्ये गोविंदा म्हणतो की, ‘तुमच्या सगळ्यांचा आशिर्वाद आणि पालकांचा आशिर्वाद, गुरुंच्या कृपेमुळे जी गोळी लागली होती ती काढण्यात आली आहे. मी रुग्णालयातील डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या सगळ्यांची प्रार्थना महत्त्वाची ठरली. सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद’

गोविंदाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाने उपचार करून पायातली गोळी काढली असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या गोविंदाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button