महाराष्ट्रराजकारण
निवडणुकीत बहिणीविराेधात पत्नीला उमेदवारी द्यायला नकाे हाेती – अजित पवार
मुंबई : राजकारण हे घरात शिरू द्यायचे नसते, बारामती लाेकसभा निवडणुकीत बहिणीविराेधात पत्नीला उमेदवारी द्यायला नकाे हाेती, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पश्चात्ताप व्यक्त केला.
बारामतीत तुमची काेणी लाडकी बहीण आहे का? असा सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला हाेता. त्यावर ते म्हणाले की, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, पण सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी आहेत. अनेक घरांत राजकारण चालतं. पण राजकारण हे घरात शिरु द्यायचं नसतं. लाेकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविराेधात सुनेत्रा पवार यांना उभं करायला नकाे हाेतं. पार्लमेंट्री बाेर्डकडून सुनेत्रांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला हाेता. बाण एकदा सुटला, की ताे माघारी घेता येत नाही. मात्र आज माझं मन मला सांगतं, की तसं व्हायला नकाे हाेतं, असं अजित पवार म्हणाले.