महाराष्ट्रराजकारण

अमित ठाकरे हे आपल्याच घरातील मुलगा, महायुतीने समर्थन द्यावं : आशिष शेलार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात शिंदे गटाकडून सदा सरवणकर तर उद्धवसेनेकडून विभागप्रमुख महेश सावंत हे निवडणूक लढणार आहे. त्यामुळे तेथील िनवडणूक ही तिरंगी होणार आहे. याच दरम्यान यावर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे.

“आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू, अमित ठाकरेंना महायुतीने समर्थन द्यावं” अशी पोस्ट आशिष शेलार यांनी सोशल मिडीयावर टाकली आहे. महायुतीमधील एक नातं जपण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचं देखील सांगितलं. “सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. यातून जनतेत एक चांगला संदेश जाईल.”

“हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव मैदानात उतरले असतील तर आपणही नाते जपायला हवे. भले उद्धव ठाकरे यांना वाटत नसेल तरी महायुतीने नाते जपावे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढत असेल तर महायुतीमधून एकत्र येऊन समर्थन देऊ असे मला वाटतेय.”

“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. महायुतीमध्ये एक नाते आपण जपायला हवे असे मला वाटते. दाऊदशी संबंधित असलेल्या नवाब मलिक यांचे काम भाजपा कार्यकर्ते करणार नाहीत. आमची भूमिका ठाम आहे” असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button