महाराष्ट्रराजकारण

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ; आता करुणा मुंडेची थेट हायकोर्टात धाव

छ. संभाजीनगर : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख विरोधक आणि सत्ताधारी आमदारांच्या रडारवर असलेले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवण्यासह करुणा मुंडे यांचा परळी विधानसभा निवडणुकीतील अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी दबाव टाकल्याचा आरोपही करुणा मुंडे यांच्या वकिलांनी केला असून याबाबत त्यांनी कोर्टात दाद मागितली आहे. करुणा मुंडे यांच्यामार्फत करण्यात आलेल्या या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, करुणा मुंडे यांच्या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधात विविध ठिकाणी खटले सुरू आहेत. मात्र या खटल्यांची माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा आरोप आहे.

करुणा मुंडेंचा निवडणुकीतील अर्ज कसा बाद झाला होता?
परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परळीचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांच्याकडे दाखल केले होते. या ५८ उमेदवारांपैकी छाननी दरम्यान दहा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वेगवेगळ्या कारणाने अवैध ठरविण्यात आले. यामध्ये करुणा मुंडे यांच्या अर्जाचाही समावेश होता. करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्तीसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जामध्ये सूचकांच्या नावापुढे केलेल्या सह्या आपल्या नसल्याचे सूचकांनी नामनिर्देशनपत्र छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे करुणा मुंडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला होता.

दरम्यान, धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या गुडांनी सूचकांवर दबाव टाकून सही बनावट असल्याचा दावा करण्यास सांगितल्याचा आरोप आता करुणा मुंडेंकडून करण्यात आला आहे.

करुणा शर्मांच्या याचिकेत नेमकं काय?
धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध करुणा शर्मा यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांचा आहे.

करुणा शर्मांचे वकील काय म्हणाले?
करुणा शर्मांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी करुणा मुंडे यांचा फॉर्म 30-10-2024 ला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता. त्याविरोधात आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झालीय ती करप्ट प्रॅक्टिस आहे. त्यामुळे आम्ही करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटीशन दाखल केली आहे. त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून, तिचा कुठे उल्लेख केलेला नाही.

तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलाही उल्लेख केलेला नाही. फक्त तिच्याकडून झालेली दोन मुलं, त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या दोघांमध्ये ज्या केसेस पेंडिंग आहेत, मुंबई, संभाजीनगर, पुणे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा कुठे उल्लेख केला नाही.

ही सगळी माहिती त्यांनी लपवून ठेवलेली आहे. कायद्याप्रमाणे जर निवडणूक फॉर्म भरताना कुठली माहिती लपवून ठेवली तर त्याला सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते. त्याला पुराव्याची गरज नाही. कारण सगळी कागदपत्रे पुरावे आमच्याकडे आहेत”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button