क्राइमदेश-विदेश

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादलवर गोळीबार, थोडक्यात बचावले

अमृतसर : शिरोमणी अकाली दल (एसएडी) नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरात गोळीबार झाला. यातून ते थोडक्यात बचावले आहेत. सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

सुखबीर सिंग बादल यांच्यासह शिरोमणी अकाली दलाचे नेते 2 डिसेंबर रोजी श्री अकाल तख्त साहिबने घोषित केलेल्या धार्मिक तपस्याचा भाग म्हणून ‘सेवा’ करत होते. या गोळीबारात सुखबीर सिंग बादल थोडक्यात बचावले. नारायण सिंह चौडा असे गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

कोण आहे नारायण सिंह चौडा
सुखबीर बादलवर वर हल्ला करणारा आरोपी नारायण सिंह चौडा हा बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. हल्लेखोर नारायण सिंह चौडा मिळालेल्या माहितीनुसार, तो 1984 मध्ये पाकिस्तानलाही गेला होता. पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीतही त्याचा सहभाग आहे. त्याने ‘खालिस्तानविरोधात षड्यंत्र’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे. तसेच तो अकाल फेडरेशन आणि खलिस्तान लिबरेशन फोर्सशीही संबंधित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button