क्रीडामहाराष्ट्र

‘प्रो गोविंदा’च्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद : शिंदे

प्रो गोविंदा लीगच्या बक्षीसाचे वितरण मुख्यमंत्री हस्ते

मुंबई : – प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून १०० वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी येथील एन.एस.सी.आय.डोम येथे आयोजित प्रो गोविंदा लीगच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, आमदार प्रताप सरनाईक, मोहम्मद दुराणी, पुर्वेश सरनाईक आदिंसह स्पर्धांचे आयोजक, संघ मालक, गोविंदा पथक उपस्थित होते.

खेळामध्ये स्पर्धा असली पाहिजे, पण ती जीवघेणी नसावी. त्यामुळे यंदा आपण सर्वांनी अपघातमुक्त गोविंदा उत्सव साजरा करूया असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ सुरू आहे. या खेळाचा समावेश साहसी क्रीडा प्रकारामध्ये करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक गोविंदा उपस्थित आहेत. या गोविंदांच्या विमा संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. यंदाच्या वर्षी ७५ हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. भविष्यात हा खेळ ऑलिंपिकमध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा आपण ६० गोविंदांना स्पेनला पाठवतो आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button