
दिल्ली । रक्षाबंधन हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या तर विराेधी पक्षनेता राहुल गांधी यांनी बहिण प्रियंकासोबतचा फोटो सोशल मिडीयावर टाकत शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात मुंडे भगिनींनी धनंजय मुंडे यांना राखी बांधली.
पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींनी ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भाऊ आणि बहिणीमधील अपार प्रेमाचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधनाच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. हा पवित्र सण तुमच्या नात्यात नवीन गोडवा घेऊन येवो आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेवो. तुझ्या आयुष्यात.”
समस्त देशवासियों को भाई-बहन के असीम स्नेह के प्रतीक पर्व रक्षाबंधन की ढेरों शुभकामनाएं। यह पावन पर्व आप सभी के रिश्तों में नई मिठास और जीवन में सुख, समृद्धि एवं सौभाग्य लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2024
राहुल गांधी
रक्षाबंधनाच्या निमित्ताने राहुल गांधींनी इंस्टाग्रामवर लिहिले की, “भाऊ आणि बहिणींमधील अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण रक्षाबंधनाच्या सर्व देशवासियांना खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. संरक्षणाचा हा धागा तुमच्या पवित्र नात्याला सदैव मजबूत ठेवो. ”
भाई-बहन के अटूट प्रेम एवं स्नेह के पर्व, रक्षाबंधन की सभी देशवासियों को बहुत-बहुत बधाई और शुभकामनाएं।
रक्षा का यह सूत्र आपके इस पावन रिश्ते को सदैव मजबूती के साथ जोड़े रहे। pic.twitter.com/Xvsqj2rt4e
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 19, 2024
मुंडे बंधू-भगिनींचे रक्षाबंधन
आज रक्षाबंधन निमित्त राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या भगिनी भाजप नेत्या आ.पंकजाताई मुंडे, माजी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, ऍड.यशश्रीताई मुंडे यांनी मुंबईतील निवासस्थानी राखी बांधून त्यांचे औक्षण करत रक्षाबंधन साजरे केले.
सैनिकांना बांधल्या राख्या
सर्व सण-उत्सवाच्या काळात कुटुंबापासून दूर राहून आपल्या देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकाप्रती आपल्या सर्वांना कमालचा अभिमान आहे. यातच रक्षाबंधनाच्या या पवित्र सणानिमित्त जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमधील सोनी गावात एक खास उपक्रम पाहायला मिळाला. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना राखी आणि मिठाई देऊन स्थानिक लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली. एलओसी (नियंत्रण रेषा) जवळ असलेले सोनी गाव येथे रक्षाबंधनाच्या दिवशी स्थानिक लोक राखी बांधण्याचा आणि आपल्या सैनिक बांधवांना मिठाई देण्याचा अनोखा सण साजरा करतात. दरवर्षी रक्षाबंधनाला या गावात एक विशेष सण साजरा केला जातो, ज्यामध्ये स्थानिक महिला आणि मुले सैनिकांसोबत हा सण साजरा करतात. दरम्यान, काही मुस्लीम महिलांनी जवानांना राखी बांधली आहे. AIN या वत्तसंस्थेने आपल्या एक्स या सोशल िमडीयावर याचा व्हिडिओ टाकला आहे.
#WATCH | On the festival of ‘Raksha Bandhan’, locals tie ‘Rakhi’ and offer sweets to Army personnel in Soni village along LoC in the Uri sector of Jammu & Kashmir pic.twitter.com/FH6MO8Lj2E
— ANI (@ANI) August 19, 2024