परमपूज्य हंसराज बाबा शेवलीकर यांनी डॉ.देवेश पाथ्रीकर यांचा सत्कार करून सामाजिक कार्यासाठी दिला आशीर्वाद

बदनापूर / सय्यद नजाकत
तालुक्यात शैक्षणिक कार्यासह सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले निर्मळ क्रीडा व समजा प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.देवेश पाथ्रीकर यांचा शाल ,श्रीफळ देऊन बदनापूर येथील महानुभाव आश्रमाचे प्रमुख परमपूज्य हंसराज बाबा शेवलीकर यांनी सत्कार करून सामाजिक कार्यासाठी आशीर्वाद दिला.
बदनापूर येथे महानुभाव आश्रम असून या ठिकाणी जवळपास ३०० भक्तगण राहतात ,या आश्रमाची सर्वस्व जबाबदारी परमपूज्य हंसराज बाबा शेवलीकर यांची असून २० आगस्ट रोजी बदनापूर येथे भक्त गणांच्या वतीने परमपूज्य हांसराज बाबा यांचा गुरुपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास जालना ,छत्रपती संभाजीनगर ,बुलढाणा ,बीड आदी महाराष्ट्रातील भक्तगण उपस्थित होते ,यावेळी हंसराज बाबा शेवलिकर यांचे भक्तांनी गुरुपूजन केले.
दरम्यान निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी देखील हंसराज बाबा यांची भेट घेऊन संस्थेच्या वतीने शाल ,श्रीफळ ,संस्थचे पुस्तक देऊन सत्कार केला असता ,बदनापूर तालुक्यासह जालना जिल्ह्यात देवेश पाथ्रीकर यांनी शिक्षण क्षेत्रात नवनवीन अभ्यासक्रम बदनापूर सारख्या ग्रामीण भागात आणून उच्च शिक्षण उपलब्ध करून दिले तसेच गोर गरीब वयोवृद्ध नागरिकांच्या मदतीला मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून सामाजिक सेवा सुरु केल्याने हंसराज बाबा शेवलीकर यांनी महानुभाव पंथीयांच्या वतीने देवेश पाथ्रीकर यांचा शाल ,श्रीफळ देऊन सत्कार केला व भविष्यात आपल्या हाताने अशीच समाजसेवा व्हावी असा आशीर्वाद दिला. यावेळी डॉ.एस.एस.शेख,डॉ.राहुल हजारे,विलास जऱ्हाड,विजय जऱ्हाड आदी उपस्थित होते.