देश-विदेश

प्रयागराज येथे महाकुंभास प्रारंभ, आज पहिल्याच दिवशी 60 लाख भाविकांनी घेतले स्नान

प्रयागराज: पौष पौर्णिमेला महाकुंभ मेळाव्यात आलेले भाविक मोठ्या संख्येनं संगम किनाऱ्यावर पोहोचले आहेत. गंगा, यमुना आणि ‘गुप्त’ असलेल्या सरस्वती नदीचा प्रयागराज येथे संगम झाला आहे. झांज आणि ढोल वाजवून अनेक भाविक भजन गात असल्याचं दिसून येत आहे. महाकुंभ पौष पौर्णिमा म्हणजे आजपासून 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी महाकुंभात 40 कोटींहून अधिक भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. महाकुंभाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रयागराजमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. हजारो भाविक त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करत आहेत. आतापर्यंत 60 लाख भाविकांनी संगम किनारी स्नान केले आहे.

महाकुंभ मेळाव्यात ७ स्तरीय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रविवारी रात्री ८ वाजल्यापासून पुढील ४ दिवसांसाठी महाकुंभ परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. महाकुंभाच्या पहिल्या स्नानापूर्वीच रविवारी सुमारे ५० लाख भाविकांनी संगम येथे स्नान केले. रविवारी रात्री रिमझिम पाऊस असताना प्रतिकूल वातावरणातही लाखो भाविक प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत. “हर-हर महादेव”, “हर-हर गंगे” अशा भाविकांकडून घोषणा दिल्या जात आहेत.

मकर संक्रांतीचे पहिले प्रमुख अमृत स्नान –

गंगा, यमुना आणि रहस्यमय सरस्वती नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर जगभरातून भाविक जमले आहेत. पहिले मोठे शाही स्नान किंवा अमृतस्नान मकर संक्रांतीच्या दिवशी उद्या (दि. 14) मंगळवारी होणार आहे.

Mahakumbh 2025 Grand Inauguration in Prayagraj Lakh Of Devotees First Shahi Snan Check Photos

45 कोटीहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा –

12 वर्षांनंतर महाकुंभ साजरा होत असून या कुंभमेळ्याला 45 कोटीहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. 26 फेब्रुवारीला महाकुंभाचा समारोप होणार आहे. 183 देशांतील लोक येण्याची अपेक्षा आहे.

कुंभचे पौराणिक महत्त्व –

असे म्हणतात की देव आणि दानवांच्या समुद्रमंथनादरम्यान, अमृत कलश हे 14 वे रत्न म्हणून बाहेर आले आणि ते मिळविण्यासाठी देव-दानवांमध्ये संघर्ष झाला. राक्षसांपासून अमृत वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी विश्व मोहिनीचे रूप धारण केले आणि आपल्या वाहन गरुडाजवळ अमृत कलश दिला. जेव्हा राक्षसांनी गरुडाचा तो कलश हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन येथे अमृताचे काही थेंब पडले. तेव्हापासून दर 12 वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते, असे सांगितले जाते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button