प्रॉपर्टीसाठी भाऊ आणि वहिनीनेच तुकडे करून नदीत फेकले

पुणे -पुण्यातील मुठा नदीमध्ये हात-पाय आणि शिर नसलेल्या मृतदेह सापडला होता. याप्रकरणचा छडा लावण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. प्रॉपर्टीसाठी सख्या भाउ आणि वहिणीनेच एका महिलेची हत्या केली.
पुण्यातील मुठा नदीमध्ये डोकं, हात, पाय छटलेला मृतदेह तरंगत असताना नागरिकांना दिसून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास अत्यंत काटेकोरपणे करत पुणे पोलिसांनी छडा लावला आणि आरोपींना अटक केली.
सकीना खान नावाच्या महिलेचा ताे मृतदेह असल्याचे तपासात उघड झाले. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीना खान यांची हत्या केली. त्यानंतर घरातच धारदार शस्त्राने सकीना यांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. पुण्यामध्ये ज्यादिवशी मुसळधार पाऊस झाला त्या दिवशी आरोपींनी सकीनाच्या मृतदेहाचे तुकडे संगमवाडी येथील मुठा नदीपात्रात फेकून दिले.
त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दिली. मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी सकिना यांचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा खान यांना अटक केली. पुण्यातील पाटील इस्टेट भागातील एका खोलीच्या मालकीतून सकीना खान यांची हत्या करण्यात आली होती. ही खोली सकीना यांच्या नावावर होती. सकीना यांचा भाऊ आणि वहिनी वारंवार त्यांना या घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र त्या जात नसल्याने त्यांची हत्या करण्यात आली.