राजकारण

राणेंच्या भडकाऊ भाषणाला पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची याचिकां

मुंबई : आमदार नितेश राणे यांच्या सातत्याच्या भडकाऊ भाषणाला पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वांद्रे येथील मोहम्मद सईद यांनी वकील एजाज नख्वी यांच्यामार्फत ही केली याचिका दाखल केली आहे. याशिवाय रामगिरी महाराज, हिंदू जनजागृती समिती, गुगल, ट्विटर, पोलीस महासंचालक आणि अन्य यांना देखील याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

तसेच एकनाथ शिंदे आणि आमदार नितेश राणे मुस्लिमद्वेषी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुस्लिमविरोधी भाषणे सोशल मीडियावरून काढून टाकावी. मुस्लिमांना टार्गेट करणारे मोर्चे, आंदोलने यांचे लाइव्ह टेलिकास्ट न करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत. मुस्लिमविरोधी भाषणे, मेसेज पसरवले जाणार नाहीत, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जावीत, अशा मागण्या या याचिकेतून करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर मुस्लिमविरोधी रॅली आणि मोर्चांची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर निश्चित करावी. भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असंही मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी सध्या महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला आहे. आज त्यांचा मोर्चा अमरावतीत दाखल होणार आहे. यावेळी धार्मिक सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. अचलपूर-परतवाडा शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

अमरावती ग्रामीण क्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राणेंच्या दौऱ्यामुळे जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, असा अहवाल पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button