जेव्हा माझे मन करेल, तेव्हा तुला यावे लागेल… पोलीस शिपायाने युवतीवर केला बलात्कार, व्हिडिओ बनवून दिली धमकी
यूपी पोलिसमध्ये कार्यरत शिपायाने गावातीलच युवतीला प्रेमजालात फसवून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ बनवला. भोजपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील पीडितेने आरोप केला आहे की व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तिचे शोषण केले. जेव्हा पीडितेचा साखरपुडा रामपूरमध्ये ठरला, तेव्हा आरोपीने तिच्या भावी पतीला अश्लील व्हिडिओ पाठवून साखरपुडा तोडला. पीडितेच्या तक्रारीवर भोजपुर पोलीसांनी आरोपी मोनू कुमार विरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
भोजपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील गावातील युवतीच्या मते, तिच्या गावातील मोनू कुमार यूपी पोलिसांमध्ये शिपाई आहे आणि सध्या हरदोई जिल्ह्यातील पाली पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार कधी चाकूच्या धाकाने तर कधी बंदूक दाखवून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओही बनवला. आरोपी म्हणायचा की जेव्हा माझे मन तुझ्याशी संबंध ठेवण्याचे होईल तेव्हा तुला यावे लागेल. तसे न केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे. इज्जतीमुळे ती सर्व सहन करत राहिली. यामुळे आरोपीचे धाडस वाढले आणि त्याने अनेकवेळ वेळा तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, पीडितेच्या पालकांनी तिचा साखरपुडा रामपूरच्या टांडा पोलीस ठाणे क्षेत्रातील युवकासोबत केला. भावी पतीही यूपी पोलिसांमध्ये शिपाई आहे.
आरोपी शिपाई मोनू कुमारने युवतीच्या भावी पतीचा मोबाइल नंबर मिळवून त्याला पीडितेचे अश्लील व्हिडिओ पाठवले. सोबतच धमकी दिली की जर तू लग्न केले तर परिणाम भोगावे लागतील. त्यानंतर भावी पतीने युवतीशी लग्न करण्यास नकार दिला. पीडितेच्या कुटुंबीयांनी मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण भावी पती आणि त्याचे कुटुंबीय तयार झाले नाहीत. त्यानंतर पीडितेने कुटुंबासोबत पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी शिपाई मोनू कुमार विरोधात तक्रार दिली. यात म्हटले की आरोपी मोनू कुमार धमकी देतो की तुझे लग्न कुठेही होऊ देणार नाही आणि मी स्वतः तुझ्याशी लग्न करणार नाही. इतकेच नाही, तक्रार केल्यास संपूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी देतो.
पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी मोनू कुमार विरोधात भोजपुर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपासात जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.