अकोल्यात दोन गटात राडा… वाहने पेटवली, अनेक जण जखमी

अकोल्यातील हरीपेठ भागात दोन गटात मोठा राडा झाला. दोन गटाने एकमेकांवर दगफेक करत मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. एका रिक्षाला धक्का लागल्याने हा संपूर्ण वाद पेटला. ज्याचे रूपानंतर नंतर दगडफेक आणि जाळपोळमध्ये झालं.
या राड्यादरम्यान एक रिक्षा आणि तीन दुचाकी वाहन जमावाने जाळल्या. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. येथे ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अतिरिक्त पोलीस तुकडी मागवल्याचंही सांगण्यात येत आहे.
याच घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत की, ”यासंदर्भात मी अद्याप पूर्ण माहिती घेतलेली नाही. याचं कारण असं समजत आहे की, रिक्षाला दुचाकीचा धक्का लागला. यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची होऊन ही इतकी मोठी घटना घडली.”
अमोल मिटकरी यांनी सांगितलं की, याआधीही अशी घटना येथे घडली होती. त्याच परिसरात आता पुन्हा तशीच घटना घडली आहे. यात जो कोणी दोषी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. अकोला सारख्या सुसंस्कृत जिल्ह्याला असं चित्र, निश्चितच चांगलं नाही, असं ते म्हणाले.