आठवले गटाकडून समीर वानखेडे उतरणार रिंगणात

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अन्य छोट्या पक्षांनाही जागा देण्याची रणनीती आखली जात आहे. भाजपने आपल्या कोट्यातून महाराष्ट्रातील 4 विधानसभा जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत. ज्या पक्षांना जागा देण्यात आल्या आहेत, त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय (ए) पक्षाचाही समावेश आहे. महाआघाडीत आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 2 जागा देण्यात आल्या आहेत. कलिना विधानसभेची जागा भाजपच्या कोट्यातून आणि धारावी विधानसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात आली आहे.
धारावी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर IRS अधिकारी समीर वानखेडे वानखेडे इच्छुक आहेत. विशेष म्हणजे महायुतीकडून मुंबईतील कलिना आणि धारावी मतदारसंघाची जागा RPI आठवले गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे धारावीचं तिकीट वानखेडे यांना मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. समीर वानखेडे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्या इच्छुक आहेत. समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, धारावीची जागा आठवले यांच्या वाट्याला गेल्याने समीर वानखेडे RPI च्या तिकीटावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मित्रपक्षासाठी भाजपने चार जागा सोडल्यात. बडनेरा युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडलं. राष्ट्रीय समाज पक्षाला गंगाखेडची जागा दिली. तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला कलिनाची जागा देण्यात आली आहे.