क्राइममहाराष्ट्रराजकारण

सारंगी महाजनचे धनजंय-पंकजांवर गंभीर आरोप, भावा-बहिणीने बळजबरीने घेतली….

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवंगत नेते प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दोन्ही मुंडे बहीण भावाने प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 आर जमीन जबरदस्तीने घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत.

सारंगी महाजन पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, परळीत माझी 63.50 आर जमीन होती, 36 आर जमीन फ्रॉड करुन विकली. मला परळीच्या अनुसूया हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले. तिकडे माझ्याकडून सही करुन घेण्यात आली. कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्याने म्हटले की, सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडून देणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे सारंगी महाजन यांनी सांगितले. गोविंद बालाजी मुंडे याने आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडले. त्यानंतर आमच्याकडून त्याने एक लाख रुपये घेतले, असेही सारंगी महाजन यांनी सांगितले

सारंगी महाजन यांचे पती प्रवीण महाजन यांनी भाजपचे लोकप्रिय नेते आिण स्वत:चे सख्खे बंधू प्रमोद महाजन यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर प्रवीण महाजन यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर प्रवीण महाजन काही काळ तुरुंगात होते. ते 2021 साली पॅरोलवर सुटून बाहेर आले असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या. ते जवळपास अडीच महिने कोमात होते. यानंतर ठाण्यातील एका रुग्णालयात प्रवीण महाजन यांचे निधन झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button